बाजीप्रभू जिवंत करणारे अजय पूरकर
Mar 25, 2025
आपल्या अभिनयाने बाजीप्रभू देशपांडे यांची प्रतिमा पुन्हा जिवंत करून समस्त महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी आणणारे अभिनेते अजय पुरकर यांची अजून काही विशेष ओळख सांगणं काही गरजेचे नाही.अभिनय करून लोकांच्या मनावर छाप सोडणारे कित्येक कलाकार आहेत.पण ह्या माणसाकडे आयुष्य जगणायची एक वेगळीच Clarity आहे जी की प्रचंड सकारात्मक आहे. विविध भूमिकांतून विविध रंग उधळणारा अभिनेता माणूस म्हणून कसा आहे हे जाणून घ्यायची संधी आरपारला लाभली.
अजय पूरकर यांचा संपूर्ण एपिसोड पाहण्यासाठी
https://youtu.be/iBfDYJUuCIc
अनेक ऐतिहासिक सिनेमांमध्ये यांच्या भूमिका आपण पाहिल्या आहेत पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काही विशेष मुद्द्यांवर त्यांचे मत काय आहेत हे आपण या मुलाखतीत जाणून घेतलं आहे, लग्न व्यवस्थेत ज्या अडचणी आहेत, कशा अपेक्षा वाढत चाललेले आहेत आणि त्यातून निर्माण होणारे वाद कसे टोकाला जातात. कमावणाऱ्या बाईला attitude येणं स्वाभाविक आहे असं ही ते म्हणाले. पण आधीच्या काळा पासून ते आज पर्यंत गोष्टी कशा बदलत गेल्या हे त्यांनी खूप छान समजावून सांगितलं आणि या झालेल्या बदलाचे एक सकारात्मक घटक होणं गरजेचं आहे असं ते म्हणतात. समाजात बदलत गेलेल्या गोष्टींमध्ये फक्त नवरा बायकोच नातंच नाही तर पालकत्व, इतर नाते संबंध ही आहेत ह्याची त्यांनी आठवण करून दिली. पालकांनी वयात येणाऱ्या मुलांना कसं हाताळलं पाहिजे ह्यावर त्यांनी खूप रोचक असे उदहारण देऊन समजावलं. आजची पिढी किती समृद्ध आहे हे सांगत असताना त्यांनी आजच्या पिढीला घाई सुद्धा तितकीच आहे याची काळजी व्यक्त केली. ह्याच सोबत त्याच्या तरुणपणीचे काही मजेशीर किस्से सुद्धा नाही आरपारच्या दर्शकांसाठी सांगितले.
पुरुष म्हणून समाजात वावरताना कसं भाण राखून जगलं पाहिजे ह्यावर त्यांनी भाष्य केलं आहे. 'आपल्या ताकदीचा गाजावाजा न करता डोकं शांत ठेवणे हीच मर्दानगी असते' असा सल्ला त्यांनी समाजाला दिला. तरुण पिढीने कसं आपलं काम सातत्याने केलं पाहिजे आणि instant results च्या मागे पळू नये ह्याची समज दिली. बाहेरून जस मजा मस्तीमध्ये पुरुषांचं आयुष्य दिसत अगदी तसं ते नाही, त्या व्यतिरिक्त सुद्धा पुरुषांच्या आयुष्याचे अनेक बाजू आहेत हे त्यांनी व्यक्त केलंय. त्यांच्या बोलण्यावरून एका गोष्टीची जाणीव मात्र नक्की होते कि खरंच .... "पुरुष हा स्वातंत्र्याच्या बंधनात असतो" पण इतकं असूनही आयुष्य कसं जगावं कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, ह्याची शिकवण अजय पुरकर ह्यांनी त्यांच्या शैलीत दिली आहे.
एक कमाल आणि बिनधास्त माणूस ज्याचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच निराळा आहे. एखाद्या माणसानं वैचारिक दृष्ट्या किती क्लिअर असावं हे त्यांच्या बोलण्यातून समजून येतं. आयुष्याचे बरेच महत्त्वाचे धडे खूप मजेशीर पद्धतीने त्यांनी शिकवले आहेत.
फक्त वाचून हा विषय सोडू नका, संपूर्ण व्हिडिओ आरपार चॅनेल वर नक्की बघा.....
मग समजून जाईल की इतक्या सहजपणे मनोरंजनातून ही आयुष्याची शिकवण देता येते.